॥ श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र ॥

महालाश्री स्वामी समर्थ विश्वकर्मा मंदिर, आपटा फाटा – स्थापना १९८४

“अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||”
Temple Image

स्थापना आणि आध्यात्मिक प्रेरणा

सन २२ जुलै १९२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आतवणे येथे जन्मलेल्या परमपूज्य नाना महाराज परांजपे यांच्या जीवनात बालपणापासूनच अध्यात्माची गाढ ओढ होती. संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आणि “ओम नमः शिवाय” या जपातून त्यांनी आध्यात्मिक साधना सुरू केली. सन १९६५ मध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या कृपेने त्यांचा परमपूज्य श्री नामदेव महाराजांशी गुरुसंपर्क झाला. श्री स्वामी समर्थांनी त्यांना मानवसेवा, अन्नदान आणि दुःखी-पीडितांच्या उद्धाराचे कार्य करण्याची प्रेरणा दिली. भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) हे अनन्य श्रद्धा, करुणा आणि “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या आश्वासनासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या कृपाशीर्वादातूनच नाना महाराजांच्या जीवनकार्याला दिव्य दिशा मिळाली. सन २७-१०-१९८२ रोजी परमपूज्य नाना महाराज परांजपे यांच्या दिव्य साक्षात्कारातून श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्राची स्थापना झाली. श्री स्वामी समर्थांनी मानवसेवा आणि विश्वकल्याणासाठी मठ उभारण्याची आज्ञा दिली, अशी त्यांची श्रद्धा होती. कर्नाळा अभयारण्याच्या सान्निध्यात, आपटा फाटा – बारापाडा परिसरातील शांत, निसर्गरम्य आणि सात्विक वातावरणात हा पवित्र मठ उभा राहिला. तेव्हापासून अन्नदान, आध्यात्मिक साधना, सामाजिक सेवा आणि भक्तीपरंपरेचा अखंड दीप येथे प्रज्वलित आहे..

Nana Maharaj Vertical

पूज्य नाना महाराज परांजपे
(२२ जुलै १९२२ – २९ सप्टेंबर २०१३)

पूज्य नाना महाराज परांजपे यांचे जीवन आध्यात्मिक श्रद्धा, सेवा आणि समर्पण यांचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील आतवणे येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांना संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची गोडी लागली आणि अध्यात्माची ओढ निर्माण झाली. शिक्षणानंतर त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय सैन्यात ‘सिव्हिलियन’ म्हणून सेवा बजावली. पुढे ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन लिमिटेड’मध्ये ड्राफ्ट्समन म्हणून कार्य करून १९८० साली निवृत्ती घेतली. नोकरी करतानाही ते सहकाऱ्यांना प्रवचनाद्वारे आध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. १९६५ मध्ये त्यांचा संपर्क परमपूज्य श्री नामदेव महाराजांशी आला. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच हा गुरुसंपर्क झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. नामदेव महाराजांनी त्यांना “भुकेल्यांना अन्नदान आणि दुःखी-पीडितांची सेवा” हेच खरे साधन मानण्याचा उपदेश केला. नाना महाराजांनी जीवनभर हाच सेवामार्ग स्वीकारला. एक प्रसंग त्यांच्या अढळ श्रद्धेचा दाखला देतो—नोकरी गेल्यावर त्यांनी पूर्ण विश्वासाने भगवान श्रीकृष्णावर आश्रय ठेवला. “अनन्याश्चिन्तयन्तो मां…” या गीतेतील वचनाचा अनुभव त्यांना आला आणि अल्पावधीतच त्यांना अधिक चांगली नोकरी प्राप्त झाली. त्या दिवसापासून त्यांनी पूर्ण समर्पणाने स्वामींच्या इच्छेला स्वतःला अर्पण केले. निवृत्तीनंतर त्यांनी लोणावळा येथे वास्तव्य केले. पुढे मानवकल्याणाच्या हेतूने ‘श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र’ (आपटा फाटा) ची स्थापना केली. त्यांचे संपूर्ण जीवन निःस्वार्थ सेवा आणि भक्तिभाव यांना अर्पण होते. नाना महाराजांचा संदेश “निःस्वार्थ सेवा आणि मानवप्रेम हा ईश्वरप्राप्तीचा सर्वात जलद मार्ग आहे. सांसारिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा आणि त्यानंतरच दिव्य आनंदाचा ध्यास घ्या.”

Palkhi Utsav

आध्यात्मिक वातावरण

दररोज काकड आरती, नामस्मरण, धूप आरती. दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरे. यज्ञ, हवन, भजन, कीर्तन. सात्विक ऊर्जा आणि शांतता अनुभवणारे स्थान.

Food Help

सामाजिक सेवा उपक्रम

अन्नदान (दर गुरुवारी महाप्रसाद). धान्य व कपडे वाटप. साड्या वितरण. शालेय साहित्य. मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया. रक्तदान शिबिर. आरोग्य तपासणी. दंतचिकित्सा शिबिरे. जिल्हा परिषद शाळांना मदत.

Oldage Home

वृद्धाश्रम व वेद पाठशाळा

वृद्धाश्रमामध्ये निराधार ज्येष्ठ नागरिकांची सेवा केली जाते. त्यांना निवारा, अन्न व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते. वेद पाठशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेद, संस्कृत आणि धर्मशिक्षण दिले जाते. भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन हे उद्दिष्ट.

“सेवा हीच खरी ईश्वर भक्ती”
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हा मठ श्रद्धा, सेवा आणि मानवकल्याणाचा दीप अखंड प्रज्वलित ठेवत आहे.

They Need Your Help!

Dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt.